Saturday, March 27, 2010

मुठे रेसिपी(Muthe recipe)


मुठे हा खास विदर्भाताला पदार्थ आहे. आज काल घरच्याना रोज काही तरी नविन खायला लागत. आशा वेळी हा पदार्थ आपण बदल म्हणून नक्कीच करू शकतो :) मला ही पाककृती आमच्या आईंनी सांगितली आणि माला तुमच्या सोबत शेयर करावी वाटली. रेसिपी सोबत रेसिपी चा फोटो पण पठवत आहे म्हणजे बऱ्यापैकी अंदाजा येइल.

मुठे:
३-४ मध्यम आकाराचे दोडके
१-२ वाटी गव्हाचे पीठ
तिखट
मीठ
काळा
मसाला
हळद
हिंग
धने पूड
तेल

कृती - दोडके धुन त्याचे साल काढून दोडक्याच्या भाजी प्रमाने चिरून घ्यावे.पराती मधे गव्हाचे पीठ घेउन त्यात चवी नुसार तिखट,मीठ,धने पूड,ओवा आणि थोड मोहन टाकुन कणिक मळुन घ्यावी. कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.ह्यालाच मुठे असा म्हणतात.
कढाई मधे थोड तेल टाकुन त्यात मोहरी टाकुन फोडनी करून घ्यावी व त्यात हिंग ,तिखट, हळद टाकुन मग दोडके टाकावे. एक वाफ आली की त्यात काळा मसाला व मुठे टाकावे व झाकण लाउन शिजू द्यावे.
दोडक्यालाच पानी सुटत असल्याने परत पाणी टाकायची गरज नाही
दोडके शिजले की मुठे तयार झाले समजावे.
हे मुठे पोळी बरोबर आथवा नुसते कुस्करून खावे एकदम झक्कास लागतात :)