साहित्य :
बेसन : एक वाटी
साखर : दोन चमचे
लीम्बुसात्वा : एक चमचा
मीठ : चवीनुसार
हळद : चिमुटभर
सोडा : पाऊन चमचा
कृती :
प्रथम बेसन,साखर,लीम्बुसात्वा,मीठ,हळद पाणी घालून चांगला फेटून घ्या. मिश्रण फार घट्ट पण नको आणि पातळ पण नको.
फेटलेले मिश्रण १५ मी. ठेवा आणि मग त्यात सोडा घालून मिश्रण फेटून घ्या. आता केक बनवण्याचे पात्र घ्या आणि पात्राला आतून तेल लावून घ्या व त्यात वरील मिश्रण टाका.
आता कुकर मध्ये थोडा पाणी टाकून हे पत्र ठेवा व कुकर ची शिट्टी काढून कुकर २० मी. साठी लावा.
२० मी. नंतर पत्र काढून घ्या व थंड झाला कि एका ताटली मध्ये उलट करा.