Saturday, August 6, 2011

स्वीट कॉर्न चाट (Sweet corn chat)



साहित्य:
स्वीट कॉर्न : एक वाटी
उकडलेला बटाटा : आर्धी वाटी
बारीक चिरलेली सिमला मिरची : अर्धी वाटी 
ओरगनो : चवी नुसार 
चिली फ्लेक्स : चवी नुसार 
tomato केचप : चवी नुसार
मीठ : चवी नुसार
चाट मसाला : चवी नुसार
कोथिंबीर : सजावटी साठी
कृती:
प्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.पातेल्यावर चाळणी ठेऊन ५ मी. साठी कॉर्न  वाफवून घ्या. थोड्या वेळाने कॉर्न चा गोड वास आला कि शेगडी बंद करा.
आता एका कढई मध्ये बटर टाकून त्यात सिमला मिरची टाका व थोडा वेळ होऊ द्या. आता कॉर्न  टाका व थोड्या वेळाने बटाटा कुस्करून टाका.थोडी वाफ आली कि त्यात चिली फ्लेक्स,मीठ टाका.
एक वाफ आली कि शेगडी बंद करा व थोडा वेळाने त्यात tomato केचप, ओरगनो व चाट मसाला टाका.आणि कोथिंबीर पसरवून सर्व्ह  करा. :)