Thursday, September 15, 2011

उपासाचे आप्पे (upasache appe)

साहित्य:
२ वाटी भगर        
१/२ वाटी साबुदाणा
हिरवी मिरची 
दाण्याचा कूट 
मिथ

कृति 
पाहिले भगर आणि साबुदाणा वेगळ्या भांड्यात रात्रभर भिजवा. दुसरया दिवशी हे मिश्रण एकत्र करून मिक्स़र मधून काढून घ्या आणि दिवसभर भिजू दया.(इडली पीठा सारखेच, फक्त तंदुल ऐवजी भगर आणि उड़द ड़ाल ऐवजी साबुदाणा घ्यावा.)

तयार मिश्रण मधे आता हिरवी मिरची  पेस्ट,दाण्याचा कूट ,मीठ  टाकुन अप्पे पात्रात अप्पे लावा आणि गरम गरम खयाला दया :)

Tuesday, September 13, 2011

cheese grilled sandwich

साहित्य :
उकडलेला बटाटा १
सिमला मिर्ची बारीक़ चिरलेली १
टमटा बारीक़ चिरलेला १
कोथिम्बिर 
चाट मसाला
हिरवी मिरची बारीक़ चिरलेली
ब्रेड
मीठ चवीनुसार 
लसूण २-३ पाकळ्या
चीज़ 
बटर

कृति :
पहिल्यांदा ब्रेड ला मधून त्रिकोनी अकारत कापून घ्या.
ब्रेड ला आतून बटर लावून घ्या.
एक भांड्यात बटाटा,सिमला मिर्ची,टमटा,वाटलेला लसूण मिर्ची,चाट मसाला,मीठ  एकत्र करा.
हे मिश्रण ब्रेड मधे भरा,वर चीज़  टाका,आणि ब्रेड चा उरलेला अर्धा भाग वरून लावा.
नंतर ग्रिलर मधे टाकुन sandwich तयार करून घ्या. :) :) 





Saturday, August 6, 2011

स्वीट कॉर्न चाट (Sweet corn chat)



साहित्य:
स्वीट कॉर्न : एक वाटी
उकडलेला बटाटा : आर्धी वाटी
बारीक चिरलेली सिमला मिरची : अर्धी वाटी 
ओरगनो : चवी नुसार 
चिली फ्लेक्स : चवी नुसार 
tomato केचप : चवी नुसार
मीठ : चवी नुसार
चाट मसाला : चवी नुसार
कोथिंबीर : सजावटी साठी
कृती:
प्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.पातेल्यावर चाळणी ठेऊन ५ मी. साठी कॉर्न  वाफवून घ्या. थोड्या वेळाने कॉर्न चा गोड वास आला कि शेगडी बंद करा.
आता एका कढई मध्ये बटर टाकून त्यात सिमला मिरची टाका व थोडा वेळ होऊ द्या. आता कॉर्न  टाका व थोड्या वेळाने बटाटा कुस्करून टाका.थोडी वाफ आली कि त्यात चिली फ्लेक्स,मीठ टाका.
एक वाफ आली कि शेगडी बंद करा व थोडा वेळाने त्यात tomato केचप, ओरगनो व चाट मसाला टाका.आणि कोथिंबीर पसरवून सर्व्ह  करा. :) 

Saturday, July 16, 2011

झटपट खमंग ढोकळा(Zatpat dhokala)


साहित्य :
बेसन : एक  वाटी
साखर : दोन  चमचे
लीम्बुसात्वा : एक  चमचा
मीठ : चवीनुसार 
हळद : चिमुटभर 
सोडा : पाऊन चमचा 

कृती :
प्रथम बेसन,साखर,लीम्बुसात्वा,मीठ,हळद पाणी घालून चांगला फेटून घ्या. मिश्रण फार घट्ट पण नको आणि पातळ पण नको.
फेटलेले मिश्रण १५ मी. ठेवा आणि मग त्यात सोडा घालून मिश्रण फेटून घ्या. आता केक बनवण्याचे पात्र घ्या आणि पात्राला आतून तेल लावून घ्या व त्यात वरील मिश्रण टाका.
आता कुकर  मध्ये थोडा पाणी टाकून हे पत्र ठेवा व  कुकर ची शिट्टी काढून कुकर २० मी. साठी लावा. 
२० मी. नंतर पत्र काढून घ्या व थंड झाला कि एका ताटली मध्ये उलट करा.
आता ह्या काढलेल्या धोकाल्या वर फोडणी पसरवा आणि चं कोथिंबीर टाकून सजवा. :)